नाही-हो म्हणता म्हणता,
एकदाचा होकार तिने दिला होता.
आज-उद्या करता करता,
त्या पहिल्या भेटीचा मुहूर्त सापडला होता.
ठरल्या वेळेआधीच मी,
पोहचलो होतो तिथे.
सगळे मित्र फोन करून विचारात होते :
"काय राव आहात कुठे?"
एक-एक क्षण मला,
तासाप्रमाणे भासत होता.
तिची वाट बघताना,
माझा जीव कंठाशी आला होता.
इतक्यात...तिला पाहताच,
माझा जीव भांड्यात पडला.
मला झालेल्या आनंदाला,
पारावार न्हवता उरला.
मला पाहताच,
मस्त लाजली ती.
ओठ दुमडून छान,
गालातच हसली ती.
अलगद पावले टाकत ती,
माझ्याजवळ येत होती.
दोघांमधले अंतर कापताना,
तिची गुलाबी ओढणी वार्यावर उडत होती.
घरच्यांची नजर चुकवून,
ती भेटायला आली होती.
हे धाडस करताना ती,
थोडीशी घाबरली होती.
माझ्याशी बोलताना ती,
ओढणीशी चाळे करत होती.
बोलता-बोलता ती हळूच,
माझ्याकडे बघत होती.
सूर्याने आकाशाची साथ सोडताच,
उशीर झालाय, हे दोघांनाही कळून चुकलं.
"निघायला हवं" म्हणताना,
तिला होणारं दुःख, मला कळून चुकलं.
जाताना ती अचानक थांबली,
मागे वळून परत जवळ आली.
पुन्हा भेटू म्हणता म्हणता,
ती गालावर एक 'kiss' देऊन गेली.
तिने दिलेली 'kiss',
मी आजही 'miss' करतो.
तुमची देखील पहिली भेट,
अशीच romantic होवो,
हीच तुम्हाला 'wish' करतो.
No comments:
Post a Comment