Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Tuesday, May 17, 2011

सारखं वाटतं...

सारखं वाटतं,
ती नेहमी सोबत असावी.
पण ती सोबत असताना,
तिच्याकडे फक्त पाहत बसावं.

सारखं वाटतं,
तिच्याशी खूप बोलावं.
पण ती बोलत असताना,
डोळे मिटून फक्त ऐकत बसावं.

सारखं वाटतं,
तिच्यासोबत खूप चालावं.
पण चालत असताना,
रिमझिम पाऊस असावा.

सारखं वाटतं,
चांदण्या रात्री तिला प्रपोज करावं.
पण प्रपोज करताना,
चंद्र साक्षीला असावा.

सारखं वाटतं,
फक्त तिच्यासाठी जगावं.
पण तिच्यासाठी जगताना,
कधीतरी तिने देखील,
माझ्यावर मरावं.



4 comments: