प्रेम म्हणजे,
कॉलेजची खरी मजा असते,
तारुण्याची पक्की पावती असते.
नात्यांची रेशम गाठ असते,
जन्मो-जन्मीची साथ असते.
प्रेम म्हणजे,
कधी स्वप्नांमधे हरवणं असतं,
कधी स्वतःशीच हसणं असतं.
लाडाने तिच्या कुशीत शिरणं असतं,
तिच्यासोबत जगणंच सर्वस्व असतं.
प्रेम म्हणजे,
एकमेकांच्या धुंदीत जगणं असतं,
गुलाबी थंडीत तिला मिठीत घेणं असतं.
भर पावसात तिच्यासोबत भिजणं असतं,
भर उन्हात तिच्यासोबत फिरणं असतं.
प्रेम म्हणजे,
नव्या दुनियेत पहिलं पाउल असतं,
शब्दांशिवाय डोळ्यांनीच बोलणं असतं.
तिने उगीच रुसणं असतं,
मग त्याने तिला समजावणं असतं.
प्रेम म्हणजे,
बेभान मनाचा 'स्टॉप' असतं,
कवी मनाची प्रेरणा असतं.
पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे,
प्रेम म्हणजे.....प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं!
प्रेम म्हणजे.....प्रेम
ReplyDeleteअसतं,
तुमचं आणि आमचं
अगदी 'सेम' असतं!प्रेम म्हणजे.....प्रेम
असतं,
तुमचं आणि आमचं
अगदी 'सेम' असतं!
अगदी बरोबर...!!!
ReplyDelete