Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Thursday, May 31, 2012

तुझ्या आठवणी...

पुसट होत चाललेल्या,
तुझ्या आठवणी.
तरी मनात घर करून बसलेल्या,
तुझ्या आठवणी.

डोळ्यात पाणी आणणार्‍या, 
तुझ्या आठवणी. 
मग लगेचच हसवणार्‍या देखील,
तुझ्याच आठवणी.

चांदण्या रात्री माझ्यासोबत बसणार्‍या,
तुझ्या आठवणी.
आपली कहाणी चांदण्यांना सांगणार्‍या,
तुझ्या आठवणी.

माझ्यासोबत कविता करणार्‍या,
तुझ्या आठवणी.
त्या कविता गाणार्‍या देखील,
तुझ्याच आठवणी.

माझ्यासवे पावसात भिजणार्‍या,
तुझ्या आठवणी.
खिडकीत बसून पावसाचे थेंब वेचणार्‍या देखील,
तुझ्याच आठवणी.

माझ्याशी अखंड बडबडणार्‍या,
तुझ्या आठवणी.
मग अचानक मूकं होणार्‍या  देखील,
तुझ्याच आठवणी.

कितीही हरवल्या तरी,
परत सापडणार्‍या तुझ्या आठवणी.
तुझ्याविना जगताना पण आता,
उरल्यात त्या फक्त...तुझ्या आठवणी...
तुझ्या आठवणी...तुझ्या आठवणी...
.

Sunday, April 29, 2012

मला आवडतं तुझ्यात हरवणं...

मला आवडतं,
तुझं तासनतास बोलणं.
तुझ्या त्या गप्पांमध्ये,
तुझ्या डोळ्यात हरवणं.

मला आवडतं,
तुझं पावसात भिजणं.
हातातली छत्री टाकून,
तुझं प्रत्येक थेंबाला बिलगणं.

मला आवडतं,
तुझं माझ्यावर रुसणं.
पण कान पकडून उठाबशा काढल्यावर,
लगेच चेहर्‍यावर हसू उमटणं.

मला आवडतं,
समुद्रकिनारी तुझ्यासवे हिंडणं.
तुझा हात हाती घेऊन,
त्या वाळूत अनवाणी चालणं.
   
मला आवडतं,
तुला मिठीत घेणं,
मग मुद्दाम काही बहाणा करून,
तुझं मला दूर लोटणं.

मला आवडतं,
तुझ्यासवे रात्री गच्चीवर बसणं.
चांदण्या मोजता मोजता,
हळूच तुझ्या कुशीत शिरणं.

मला आवडतं,
प्रत्येक क्षण तुझ्यासाठी वेचणं.
अगं खरच सांगतोय,
मला आवडतं फक्त तुझ्यात हरवणं,
तुझ्यात हरवणं तुझ्यात हरवणं.....

Saturday, March 24, 2012

स्वप्नातलं घर...

ये प्यार क्या है,
आज मला कळलंय.
बेवफाई की आग मे,
ते फारच जळलंय.

वाईट फक्त एवढंच वाटतंय,
की माझं प्रेम तुला नाही कळलं.
पतंगाप्रमाणे माझं हृदय,
फक्त तुझ्यासाठी जळलं.

आयुष्यात नाहीस आता,
आठवणीत येऊ नकोस.
जखमी या मनावर आता,
आणखी मीठ लावू नकोस.

माझ्या स्वप्नातलं घर,
तुझ्या हृदयात शोधत होतो.
कोरड्या मनाकडे तुझ्या फक्त,
प्रेमाचा एक थेंब मागत होतो.

तुझ्याविना जगताना आता,
रोज थोडं मरतोय.
मिटलेल्या पापण्यांखाली,
पाणी थोडं ठेवतोय,
पाणी थोडं ठेवतोय...




Wednesday, February 22, 2012

काय आहे रे मनात ?

तिला माहित आहे की, तो तिच्यावर खूप प्रेम करतो. पण तो तिच्याजवळ मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा तिच्या मनात होणारी घालमेल, या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


काय आहे रे मनात,
सांगशील कधी ?
काळजातलं माझ्या,
ओळखशील कधी ?


शब्द तुझे किती बोलतात,
ओठ मात्र शांत राहतात.
आसुसलेले डोळे माझे,
तुझीच वाट पाहतात.


तुझी प्रत्येक नजर,
काळजात थेट घुसते.
कधी होशील तू माझा ?
फक्त मी एवढंच पुसते.


आज-उद्या करू नकोस,
वेळ असा घालवू नकोस.
ओठांवरल्या शब्दांना,
मागे असा घेऊ नकोस.


का मला छळतोस असा ?
आल्या पावली का वळतोस असा ?
फक्त एकदा विचारून बघ मला,
घेतलाय मी फक्त तुझाच वसा.
फक्त तुझाच वसा...


Thursday, January 12, 2012

चलो उड चले...


चलो उड चले यूंही,
ख्वाबों के बादलों में कहीं.
आजमाले अपने बाजुओं को,
देखले इनमे भी दम है या नहीं.

छोड़ दे सारी फिकर अभी,
सामने है इक डगर नई.
दिल में रख मजबूत हौसला,
डर से नहीं दिमाग से कर फैसला.

माना अंजान है रास्तों से,
मगर डरते नहीं हम फांसलो से.
जिंदगी का हर एक मिशन,
जीत जा तू दिखा अपना टशन.

माना ठीक नहीं वक्त का तराजू,
फिर भी उमंग और है आरजू.
दिल पे रख भरोसा अपने,
इक दिन छाएगा तेरा भी जादू.

गिर गए है, फिर उठेंगे,
राख से अंगार बनके.
जीत जाएंगे मौत को भी,
प्यार का इक वार करके.