आयुष्याच्या वाटेवर,
दोन पावलं सोबत चालेल,
असं कुणीही दिसत नसतं.
थकलेलं शरीर जणू,
बस म्हणत असतं.
तरीही चालत राहतं,
हे मन माझं...
आयुष्याच्या वाटेवर,
दोन गोष्टी share करील,
असं कुणीही दिसत नसतं.
ज्याला आपलं म्हणावं,
असं कुणीच कसं दिसत नसतं?
तरीही चालत राहतं,
हे मन माझं...
आयुष्याच्या वाटेवर,
येता-जाता बरीच माणसे भेटतात.
जीवाला जीव लावणारी,
आठवणीत राहतात.
इतर काळासोबत विरून जातात.
तरीही चालत राहतं,
हे मन माझं...
आयुष्याच्या वाटेवर,
अचानक काही क्षण,
गोड घटनांची,
साक्ष देऊन जातात.
तर काही मनाला चटका लाऊन जातात.
तरीही चालत राहतं,
हे मन माझं...
आयुष्याच्या वाटेवर,
एक ठराविक व्यक्ती भेटते,
जी नकळत हृदयात जाऊन बसते.
पण काळाच्या ओघात,
तीही निघून जाते.
पण तरीही....तरीही चालत राहतं,
हे मन माझं...
karech......chan lihili ahe kavita
ReplyDeletekhup khup dhanyawaad........ :-) :-)
ReplyDelete