आठवण तुझी येता,
मी स्वतःलाच हरवून बसतो.
माहित नाही का,
पण मी स्वतःशीच हसू लागतो.
आठवण तुझी येता...
आठवण तुझी येता,
मन पळू लागते उधाण.
माहित नाही का,
पण होऊन जातो मी बेभान.
आठवण तुझी येता...
आठवण तुझी येता,
जग अगदी थांबल्यासारखे वाटते.
माहित नाही का,
पण हृदयाला ते अगदी रम्य वाटते.
आठवण तुझी येता...
आठवण तुझी येता,
पापण्या अलगद मिटून जातात माझ्या.
माहित नाही का,
पण तू दिसतेस या मिटलेल्या पापण्यांत माझ्या.
आठवण तुझी येता...
आठवण तुझी येता,
जीव अगदी कासावीस होतो.
माहित नाही का,
पण तो तीळ तीळ तुटतो.
आठवण तुझी येता...
आठवण तुझी येता,
सर्व अंतरे पुसून तुला भेटावसं वाटतं.
माहित नाही का,
पण तुझ्याशी दोन क्षण बोलावसं वाटतं.
आठवण तुझी येता...
आठवण तुझी येता,
मन अगदी बहरून येते.
माहित नाही का,
पण... कधी कधी वाटतं...
काय तुलाही असंच वाटतं...?
आठवण माझी येता...
No comments:
Post a Comment