Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Tuesday, May 10, 2011

थोडंसं मनातलं...

लायब्ररीत बसली होती ती,
माझ्याकडे बघताच छान खुलली ती.
पण इतक्यात लायब्रेरीअन ओरडला सर्वाना :
''silence please".
म्हणून थोडंसं मनातलं माझ्या,
राहून गेलं सांगायचं तिला.

कॅन्टीनमध्ये बसली होती ती,
माझ्याकडे बघताच थोडीशी लाजली ती.
पण इतक्यात तिच्या मैत्रिणी आल्या,
अन तिला सोबत घेऊन गेल्या.
म्हणून थोडंसं मनातलं माझ्या,
राहून गेलं सांगायचं तिला.

बस स्टॉप वर भेटली ती,
माझ्याकडे बघताच गालातच हसली ती.
पण इतक्यात तिची बस आली,
अन ती गर्दीत नाहीशी झाली.
म्हणून थोडंसं मनातलं माझ्या,
राहून गेलं सांगायचं तिला.

बाजारात भाजी घेताना दिसली ती,
माझ्याकडे बघताच घाबरली ती.
कारण इतक्यात तिची आई समोर आली,
अन आईसोबत ती घरी निघून गेली.
म्हणून थोडंसं मनातलं माझ्या,
राहून गेलं सांगायचं तिला.

एकदा मीच गेलो तिच्या घरी,
मोठ्या हिमतीने दारावरची बेल वाजवली.
पण इतक्यात दरवाजा तिच्या बापाने उघडला,
मी लगेच तिथून काढता पाय घेतला.
म्हणून थोडंसं मनातलं माझ्या,
राहून गेलं सांगायचं तिला.

नंतर एकदा वाटेत भेटली ती,
माझ्याकडे बघताच थांबली ती.
मोठ्या धीराने मी 'i love you' म्हटलं तिला.
म्हणालो : एवढ्या दिवसापासून,
हेच थोडंसं मनातलं माझ्या,
राहून गेलं होतं सांगायचं तुला.



2 comments:

  1. जर खर ‪#‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर #प्रेम नाही..

    ReplyDelete