Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Wednesday, June 29, 2011

एकीने नाही म्हटल्यावर...

formal day ला साडीत,
काय चोख दिसत होती.
तिच्याभोवती असलेल्या गर्दीत,
ती जणू अप्सरा भासत होती.

तिची एक नजर,
माझ्यावरून फिरली होती.
तिच्या नजरेला मग,
माझीही नजर भिडली होती.

सगळ्या गोंधळानंतर,
तिला कॉफीसाठी विचारलं होतं.
थोडा विचार करून मग तिने,
माझ्यासोबत यायचं ठरवलं होतं.

CCD, बरिस्ताला जाणं,
कॉलेज मधून थेट होतं.
मला वाटलं माझं प्रेम,
तिच्या मनात बर्‍यापैकी सेट होतं.

एकट्यात गाठून तिला,
मी एकदाचं प्रपोज केलं.
तिने देखील तितक्याच लगबगीनं,
मला अपोज केलं.

असं कसं झालं?
काही कळलेच नाही,
तिचे-माझे धागे,
काही जुळलेच नाही.

दोन दिवस मग मी,
खूप उदास होतो.
काय सांगू यारो,
अगदी देवदास वाटत होतो.

तिसर्‍या दिवशी मी म्हटलं : 
चल हटा सावन की घटा,
जुल्फे नही ये तेरी,
आहेत चेटकिणीच्या जटा.

तू नही तो कोई और सही,
कोई और नही, तो कोई और सही.
एवढ्या मोठ्या जगात,
पोरींची काही कमी नाही.

माणसाने असंच मस्त,
राहायचं असतं.
आयुष्य असंच मस्त,
enjoy करायचं असतं.

एकीने नाही म्हटल्यावर,
दुसरीला पटवायचं असतं.
एकीने नाकारलेल्या प्रेमात,
मात्र स्वतःला हरवायचं नसतं.

मित्रांनो,बर्‍याचदा प्रेमात होकाराऐवजी नकार स्वीकारावा लागतो. पण मिळालेल्या नकारामुळे खचून जायचं नसतं,आपलं सर्व काही गमावून बसायचं नसतं.



2 comments: