पावसाच्या प्रत्येक थेंबात,
फक्त तुझ्याच प्रेमाचा ओलावा आहे.
उनाड पणे वाहणार्या या वार्यात,
फक्त तुझ्याच प्रेमाचा गारवा आहे.
खरच या बेधुंद मनावर माझ्या,
फक्त तुझ्याच प्रेमाची धुंदी आहे.
कडाक्याच्या थंडीत,
फक्त तुझ्याच प्रेमाची ऊब आहे.
थंडीने शहारलेल्या हृदयाला,
फक्त तुझ्याच प्रेमाचा स्पर्श आहे.
खरच या बेधुंद मनावर माझ्या,
फक्त तुझ्याच प्रेमाची धुंदी आहे.
रखरखत्या उन्हात,
फक्त तुझ्याच प्रेमाची सावली आहे.
तहानलेल्या जीवाला वाटेत,
फक्त तुझ्याच प्रेमाची पाणपोई आहे.
खरच या बेधुंद मनावर माझ्या,
फक्त तुझ्याच प्रेमाची धुंदी आहे.
आमावस्येच्या गूढ राती,
फक्त तुझ्याच प्रेमाचं चांदणं आहे.
पौर्णिमेच्या निर्मळ राती,
फक्त तुझ्याच प्रेमाचा लख्खं प्रकाश आहे.
खरच या बेधुंद मनावर माझ्या,
फक्त तुझ्याच प्रेमाची धुंदी आहे.
उधाणलेल्या सागराला,
फक्त तुझ्याच प्रेमाची नशा आहे.
त्याच्या प्रत्येक लाटेत,
फक्त तुझ्याच प्रेमाची ओढ आहे.
खरच या बेधुंद मनावर माझ्या,
फक्त तुझ्याच प्रेमाची धुंदी आहे.
तारुण्याच्या प्रत्येक गीताला,
फक्त तुझ्याच प्रेमाचा स्वर आहे.
या नवलाईच्या वाटेवर,
फक्त तुझ्याच प्रेमाचा 'stop' आहे.
खरच या बेधुंद मनावर माझ्या,
फक्त तुझ्याच प्रेमाची धुंदी आहे.
कागदावर उमटलेल्या या शब्दांना,
फक्त तुझ्याच प्रेमाचा रंग आहे.
हो...अगदी, अगदी खरं सांगतोय,
या बेधुंद मनावर माझ्या फक्त आणि फक्त,
तुझ्याच प्रेमाची धुंदी आहे,
तुझ्याच प्रेमाची धुंदी आहे.......
AaaaaaaaaaaaaaPratim kaivta aahet tuzya.......................
ReplyDeletehey....thank you very much Sujata..... :-)
ReplyDeleteniiiiiiiiiiiiiiiceeeeeeeeeee man....
ReplyDeletethanksss yaar Vaibhav........
ReplyDelete