बेधुंद वारा होऊन,
आज तुला सतवायचं आहे.
तुझा पदर हवेत,
जरा उडवायचा आहे.
मुसळधार पाऊस होऊन,
तुला बिलगायचं आहे.
तुझं अंग अंग सारं,
आज मला भिजवायचं आहे.
भिजलेल्या साडीत तुला,
जवळ घ्यायचं आहे.
तुझ्या गालावरून ओघळणारा थेंब,
मला हळूच टिपायचा आहे.
तुला जवळ घेताना तुझ्या,
काळजाची धडधड मला ऐकायची आहे.
तुझ्या नजरेतली भीती,
आज मला दूर करायची आहे.
तुझ्या-माझ्या स्वप्नांना,
आज पूर्णत्वास न्यायचं आहे.
तुझ्या-माझ्या पवित्र नात्याची,
आज रेशम गाठ बांधायची आहे.
No comments:
Post a Comment