Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Friday, June 24, 2011

तुझ्या आठवणी...

पावसाने एखाद्या प्रेयसीला चिंब भिजवल्यावर तिला आपल्या प्रियकराची आठवण नक्कीच येते. तर मग अशाच चिंब भिजलेल्या एका प्रेयसीचे काय म्हणणे आहे ते ऐका जरा...


गार गार वार्‍याने,
मला वाटेत गाठले.
तुझ्या आठवणींचे ढग,
मग माझ्या मनात दाटले.

नाही म्हणता म्हणता,
सारे आभाळ बरसले.
तुझ्या आठवणीनी,
माझे भान हरपले.

पावसाच्या प्रत्येक थेंबाने,
मला चिंब भिजवले.
तुझ्या प्रत्येक आठवणीनी,
जणू मला बिलगले.

भिजत भिजत मी,
एका आडोशाला गेले.
तिथे तुझ्या आठवणीनी,
मला आपलेसे केले.

सांगत होते पावसाला,
मला घरी जाउ दे.
तुझ्या आठवणींत,
मला वाहून जाउ दे.

पावसाने माझे,
न ऐकण्याचे ठरवले.
मग तुझ्या आठवणीनीच,
मला सावरायचे ठरवले.

असे मला पावसाने,
भर वाटेत गाठले.
तुझ्या आठवणींचे क्षण,
माझ्या डोळ्यांत साठले.

जाता जाता पावसाने केली,
एका जोरदार सरीची पाठवणी.
काय सांगू तुला,
त्या सरीत देखील होत्या,
फक्त तुझ्याच आठवणी...


2 comments: