Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Saturday, April 23, 2011

माझी लव्ह स्टोरी...

पावसाळ्याचे दिवस ते,
होते सर्व चिंब चिंब.
उगवली होती हिरवळ सर्वत्र,
हवेत होता एक मंद मंद सुगंध.

होता तो कॉलेजचा दिवस पहिला,
नवलाईचे वारे वाहत होते सर्वत्र.
निघालो होतो बेभान होऊन,
तारुण्याच्या या मोहक वाटेवरून.

इतक्यात एक थंड झुळूक,
गेली माझ्या बाजूने.
वळून पाहतो तो काय,
होती ती एक सोज्वळ अप्सरा.

पहिले तिला मी डोळेभरून,
हरवले क्षणभर भान माझे.
वाटले जणू मला,
पहली नजर में पहला प्यार हो गया.

सुटलं कॉलेज तेव्हा,
मी होतो बाहेरच.
वाट तिची बघत,
मदतीला होताच पाऊस माझ्या.

आली ती कॉलेजच्या बाहेर,
नव्हती छत्री तिच्याकडे.
मी म्हटलं : मी सोडतो तुला घरी,
गालातच हसली ती छान.

छत्री होती माझी,
मात्र तिचा वापर,
फक्त आणि फक्त 'तिच्या'चसाठी.
मन तर माझं अगदी तरंगतच होतं.

चालताना होणारा तिच्या त्या,
ओलसर ओढणीचा टच......आई गं.....
मनात तर अगदी आनंद कल्लोळ.
गेटजवळ बिल्डींगच्या सोडलं तिला,
की पुढची सगळी रात्र तिच्याच आठवणींच्या कुशीत.

मग या मनमोहक प्रसंगाची,
होऊ लागली पुनरावृत्ती.
फरक फक्त एवढाच की,
तिच्यातलं आणि माझ्यातलं,
अंतर उरलं होतं फक्त छत्रीच्या दांड्याएवढं.

बाहेर पडणारा पाऊस...
त्यात एकच छत्री...
छत्रीच्या दंडूक्याला धरताना,
एकमेकांच्या हातावर हळुवार,
अकस्मात चढणारी बोटं...

मग.....मग काय,
चौपाटीवर  दोघंही,
त्याच छत्रीत शिरले,
की जग पेटवा तिकडे.....

तर अशी होती ही माझी लव्ह स्टोरी...






4 comments: