एक होती मधुराणी,
एक होती मधुराणी,
साधी, सरळ, गोड, गुणी.
कॉलेजात आली ती आणि,
पोरांच्या झाली हृदयाची राणी.
एक होती मधुराणी...
एक होती मधुराणी,
सगळेच म्हणती, "माझी राणी".
एक झलक पाहण्या तिची,
पोरांमध्ये मारामारी.
एक होती मधुराणी...
एक होती मधुराणी,
करणारी बंद माझी वाणी.
दिवस-रात्र आता फक्त,
लिहित होतो तिचीच गाणी.
एक होती मधुराणी...
एक होती मधुराणी,
जणू एक प्रेमकहाणी.
मनी लागले वेड तिचे,
कवितेत फक्त तिचीच तराणी.
एक होती मधुराणी...
एक होती मधुराणी,
पानांवरले जणू दवाचे पाणी.
रोज भेटत होती मला,
हाय-हॅलो पुढे जाताच न्हवती गाडी .
एक होती मधुराणी...
एक होती मधुराणी,
म्हणे, "किती गोड तुझी गाणी."
विचारायचं तिला ठरवलं मनी,
पण तिच्यासमोर अडकली वाणी.
एक होती मधुराणी,
ठसली होती माझ्या मनी.
पण...पण झाली परिक्षा,
संपलं कोलेज, प्रत्येकाची वेगळी गाडी.
एक होती मधुराणी...
एक होती मधुराणी,
उरलं डोळ्यात फक्त पाणी.
माझ्या मनातली तिची गाणी,
झाली एक अधुरी कहाणी.
तर अशी होती, ती एक मधुराणी...
No comments:
Post a Comment