Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Wednesday, November 23, 2011

अंधार दाटलेला...

मिटल्या सार्‍या आशा,
धूसर झाल्या दिशा.
आयुष्याच्या वाटेवरती,
अंधार दाटलेला...

आंधळ्या पावलांना,
पायवाट सापडेना.
झिजलेल्या या मनी,
अंधार दाटलेला...

शब्द आता मुके झाले,
व्यक्त करण्या न काही उरले.
उजळलेल्या दिव्याखाली,
अंधार दाटलेला...

विस्कटली सारी नाती,
हाती उरली फक्त माती.
नात्यांच्या खोल डोहात,
अंधार दाटलेला...

किती फसवे हे जग सारे,
कितीही म्हटलं तरी नश्वर सारे.
आसुसलेल्या डोळ्यांत आता,
अंधार दाटलेला...


4 comments: