त्यादिवशी तिला पाहिलं आणि,
नकळत सारं ओठांवर आलं.
तुडुंब भरलेलं मन,
जणू अलगद रीतं झालं.
तेव्हा वाटलं खरंच,
its good to be in love...
नि:शब्द डोळ्यांनी तिच्या,
उत्तर मला दिलं.
भर उन्हात जणू,
चिंब भिजल्यागत झालं.
तेव्हा वाटलं खरंच,
its good to be in love...
वाळूत जसे पाय रुतावेत,
तसे एकमेकात गुंतलो होतो.
सारं जग आम्हाला पाहतंय,
हे तर आम्ही केव्हाच विसरलो होतो.
तेव्हा वाटलं खरंच,
its good to be in love...
दोघेही आता,
एकाच नावेचे प्रवासी.
माझं हृदय तिच्या आणि,
तिचं हृदय माझ्या उराशी.
तेव्हा वाटलं खरंच,
its good to be in love...
आता सगळं कसं,
अगदी मोकळं वाटत होतं.
भान हरपल्यागत,
पिसाहूनही हलकं वाटत होतं.
तेव्हा वाटलं खरंच यारो,
its good to be in love...
hmmmm........its good to be in love...! love!! & love!!!
No comments:
Post a Comment