Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Friday, December 30, 2011

तू...या वेड्या मनाची

जितकं जास्त विसरावं तुला,
तितकीच जास्त तू आठवणीत राहतेस.
वेड्या या मनाला मात्र,
अधिकच गुंतवून जातेस.

मनाच्या गाभार्‍यात,
मी एकटाच चालत असतो.
पुसट होत चाललेल्या तुझ्या,
पाउलखुणा शोधात बसतो.

शेवटची तुझी पाठमोरी छबी,
अजूनही लक्षात आहे.
तुझ्यावर प्रेम कसं केलं,
हे आजही न उलगडणारं कोडं आहे.

आता देखील माझ्यासाठी,
काहीच मागणार नाही.
पण, "तू सुखी राह",
हे मात्र सांगायला विसरणार नाही.

जाता जाता एवढंच सांगेन,
कितीही दूर गेलीस तू आणि कुठेही असलीस तू,
तरी सदैव राहशील तू,
फक्त या वेड्या मनाची...!
हो...या वेड्या मनाची...!!




6 comments: