आजच्या या स्पर्धा युगात माणसाच्या आयुष्यात भावनांना फार कमी किंमत राहिली आहे. आयुष्याच्या या शर्यतीत बहुतेकांना (प्रत्येकाला) येणारा अनुभव या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
खूप पुढे निघून जातो.
स्पर्धा युगात जगताना,
तो भावनांना मागे ठेवून जातो.
जीवनाच्या चढाओढीत तो,
आपसूकच गुरफटतो.
स्वत:ला सिद्ध करण्यात मात्र ,
स्वतःचे 'मी' पण हरवतो.
जीवनात बर्याचदा त्याला,
तड-जोडी कराव्या लागतात.
नको असलेल्या गोष्टी देखील,
गाठीशी बांधाव्या लागतात.
मनाच्या अंधार्या कोपर्यात,
कुठेतरी-काहीतरी खटकत असतं.
सर्वकाही कळत असतं पण...,
ते कुठेतरी वळत नसतं.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर,
शर्यत संपल्याची जाणीव होते.
दोन घटका विश्रांतीसाठी,
मग कोणाचीतरी उणीव भासते.
जुन्या आठवणींचे मेघ,
मग मनात दाटू लागतात.
पुढे जाणारी पावलं,
नकळत मागे वळू लागतात.
ओझरत्या आठवणींसोबत मग,
तो पुन्हा एकदा जगू लागतो.
हरवलेल्या वाटा तो,
पुन्हा एकदा धुंडाळू लागतो.
No comments:
Post a Comment