Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Sunday, July 17, 2011

शब्द

मनातल्या पानावर,
शब्द काही उतरत न्हवते.
वेड्या या मनाला माझ्या,
शब्द काही सापडत न्हवते.

शब्दांनी आज मुद्दामच,
न बोलण्याचे ठरवले होते.
का कोण जाणे पण,
त्यांनी उगीच रागे भरले होते.

शब्दांच्या या लपंडावात,
मन माझे पुरते अडकले होते.
त्यांना शोधता शोधता,
मन पार भरकटले होते.

आठवणींच्या गावी,
मग त्यांचा ठाव लागला.
तेव्हा कुठे मग माझ्या,
जीवात जीव आला.

शब्द मज म्हणाले :
गवसण्यास आम्हाला,
ओलांडून वेस या नजरेची,
घे भेट त्या सोनेरी क्षितिजाची.

शब्दात मग शब्द गुंतले,
मनाच्या पानावर बोल नवे उमटले.
जाता जाता हृदयाच्या तराण्यावर,
हे गीत नवे उमलले.


No comments:

Post a Comment