कधीतरी आठवणींसोबत,
एकटच बसावं.
मनातल्या अंधार्या कोपर्यात,
चांदणं शोधावं.
कधीतरी मनाला आपल्या,
शांत राहायला सांगावं.
घट्ट मिटून डोळे,
त्याच्या अंतरंगात हिंडावं.
कधीतरी क्षिताजाकडे,
एक टक पाहावं.
निरोप घेणार्या दिनकराला,
"पुन्हा भेटू" म्हणावं.कधीतरी हृदयातल्या भावना,
अलगद बाहेर काढाव्यात.
डोळ्यांतील आसवांसवे,
त्या ओठांवर ओघळू द्याव्यात.
कधीतरी दुसर्यापेक्षा,
आपल्यात चुका शोधाव्या.
दगडापुढे नमताना,
माणसात देव शोधावा.