Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Wednesday, August 24, 2016

साथ तू देशील का ?

पाहताना तुला हरवतो मी जेव्हा,
भान तेव्हा माझे होशील का ?
मुक्या त्या शब्दांचे...नाव तुझे होऊन,
ओठी माझ्या येशील का ?

गुणगुणावे वाटते मला,
गीत तेव्हा माझे होशील का ?
सूरात मिसळून माझ्या,
एकसूर तू होशील का ?

स्पर्श होतो पहिल्यांदा जेव्हा,
पावसाचा या धरे ला,
गंध तेव्हा दरवळणारा तू होशील का ?
अलगद हळुवार उठता उठता,
श्वासात माझ्या उतरशील का ?

मावळतीचा सूर्य जेव्हा क्षितिजाला टेकतो,
आकाशातला तेव्हा रंग केशरी तू होशील का ?
सांजवेळी या अशा किनारा मी,
अन लाट तू होशील का ?

आठवणींची कुपी मी उघडतो जेव्हा,
गालावर तेव्हा नकळत उमटणारे हसू तू होशील का?
चांदराती अंगाला या झोंबणारी,
गार झुळूक तू होशील का ?

बोबडे बोल लहान मुलं बोलतात जेव्हा,
त्यांचे तेव्हा निरागस डोळे तू होशील का ?
एकट्याने चालायची वाट ही सारी...तरी,
हात हाती घेऊन साथ तू देशील का ?


21 comments:

 1. This poem touched my heart.

  Love you dear. Keep wriring

  ReplyDelete
 2. प्रेमाची आतुरता

  ReplyDelete
 3. खुपच सुंदर.

  ReplyDelete