Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Sunday, July 24, 2016

हम जैसो का खयाल...

हम जैसो का कुछ तो खयाल किया करो,
अपनी इस खुबसूरती से न ऐसे घायल किया करो.
ये दिल दौड कर बाहर आ जाएगा,
इसकी धडकनों को न ऐसें बढाया करो.

चांदनी

तुम चांद से ना बातें किया करो,
ये चांद जलता है तुमसे.
तुम्हें हम चांदनी क्यों कहते है,
अकसर ये शिकायत करता है वो हमसे.

मिठी मिठी बातें...

इन मिठी मिठी बातों मे क्या रखा है,
हम तो दिल का नजराना ले आए है ।
आप कुबूल करो या ना करो,
हम तो इसे आपकी गलीं मे छोड आए है ।
 

उनकी नज़रे

उनकी नजरों से हुई दास्ताँ-ए-मुलाकात,
न हम बयाँ कर सकते,
न आप अंदाजा लगा सकते...

आसमंत सारा...

आसमंत सारा चांदण ओलावा,
अन् हात हाती तुझाच असावा.
निखळता तारा मग दोघांनी झेलावा,
क्षण हा असा पुनः पुनः यावा.

निळंभोर आभाळ...

निळंभोर आभाळ,
तुझ्या काळ्याभोर डोळ्यांत.
असा अचानक पाऊस,
तुझ्या माझ्या पुढ्यात...

हात हाती...

हात हाती गुंफलेला,
श्वास श्वासात गुंतलेला.
थरथरत्या तुझ्या या ओठांचा स्पर्ष,
जणू थंडीतला उबेचा हर्ष.

आठवणींची कुपी...

आठवणींची कुपी,
कधी अलगद उघडावी.
त्यातील एक एक आठवण,
मग पुन्हा जगावी.

असं कधी होणार नाही...

असं कधी होणार नाही की,
तुझी आठवण मला येणार नाही.
तुझी वाट पाहणार्या डोळ्यांमध्ये,
दोन थेंब कधी तरळणार नाहीत.

पाऊस म्हणजे...

पाऊस म्हणजे चिंब आठवण,
कोरड्या मनातली ओली साठवण.
मनाच्या कोपऱ्यातलं एक हिरवं पान,
किंवा आत्ताच न्हालेलं हिरवं रान.
ओलाव्याच्या कुशीत हरवलेलं भान,
नव्या तरुणाईचं अन् नव्या नवलाईचं,
मनात विसावलेलं गुपित छान.
जाता जाता तुझ्या-माझ्या,
हुरहुरणार्‍या भेटीचं कारण छान.

मनातले शब्द

मनातले शब्द,
ओठांवर यायचे राहून जातात.
तुला सांगण्याआधीच तुझे डोळे,
सारं काही बोलून जातात.

थोडसं मनातलं...

थोडसं सुखातलं,
थोडसं दुःखातलं.
थोडसं तुमच्यातलं,
थोडसं माझ्यातलं.
थोडसं जगातलं,
थोडसं जीवतलं.
तुमच्या-माझ्या, सर्वांच्या...,
थोडसं मनातलं...

वाटतं...

वाटतं... 
तुझ्या या टपोर्‍या डोळ्यात,
खोलवर बुडून जावं.
तुझ्या या सोनेरी पापण्यांत,
स्वतःला बांदिस्त करावं.

मन पाऊस पाऊस...

पहिल्या पावसाची,
पहिलीच सर.
पहिल्या सरीचा,
पहिलाच थेंब.
पहिल्या पावसात,
झाले मन धुंद.
पहिल्या पावसाने,
आणला तो मातीचा गंध.
पहिल्या पावसात झाले,
मन पाऊस पाऊस...
 

सूर्य म्हणतोय

सूर्य म्हणतोय : आज मला,
उठायला जरा कंटाळा आलाय.
कारण पहिल्या पावसाच्या स्वागतासाठी, 
सारं आभाळ दाटून आलय.


आखों से उनकी तस्वीर

आखों से उनकी तस्वीर हटती ही नहीं,
दिल से उनकी यादें मिटती भी नहीं.
भूलाए तो भूलाए भी कैसे उन्हें,
उनके बिना धडकने चलती भी तो नहीं.