Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Friday, July 11, 2014

चेहरा

तडकलेल्या आरशातला तिचा चेहरा...
बरंच काही दडलंय त्यात,
जणू न सुटणारं कोडं.
काहीतरी सांगायचं आहे त्या चेहऱ्याला.
खूप बारीक खुणा आहेत त्या चेहऱ्यावर,
काही काळाच्या, काही समाजाच्या.
अस्तित्व आणि भास यातील रेघ,
त्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.
डोळ्याखालचं काजळ पण गालावर आलंय,
पापण्यांखालचा झरा पण आटला आहे,
पण कधी ? वाटतं खूप आधीच.
त्या आरशाचे तुकडे जोडतेय ती,
होत आहेत जखमा,रक्त पण येतंय थोडं.
पण काळासोबत चालायला हवं,
भूतकाळात थांबून इथं चालायचंय थोडं ?