Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Saturday, July 30, 2011

अर्धांगिनी

पहिल्यांदा पाहिलं तुला,
तेव्हा काळजाचा ठोकाच चुकला होता.
माझ्या नजरेचा तीर,
तेव्हा जरासाठी हुकला होता.

आता दिवसा-रात्री, सगळीकडे,
तू आणि तूच दिसत असतेस.
माझ्या स्वप्नांत देखील आता,
फक्त तूच निजत असतेस.

तुझं एकदा वळून पाहणं,
एवढं सुखावून जातं,
की पुढच्याच क्षणी मग,
जग जिंकल्यासारखं वाटतं.

तू दिलेल्या एका smile वर,
मला फक्त heart attack यायचा राहतो.
तुला डोळेभरून पाहताना,
मी श्वास घायचा देखील विसरतो.

आयुष्याच्या या वाटेवर,
सांग साथ तुझी देशील का?
आता हे आयुष्य जगताना,
सांग अर्धांगिनी माझी होशील का???



Sunday, July 17, 2011

शब्द

मनातल्या पानावर,
शब्द काही उतरत न्हवते.
वेड्या या मनाला माझ्या,
शब्द काही सापडत न्हवते.

शब्दांनी आज मुद्दामच,
न बोलण्याचे ठरवले होते.
का कोण जाणे पण,
त्यांनी उगीच रागे भरले होते.

शब्दांच्या या लपंडावात,
मन माझे पुरते अडकले होते.
त्यांना शोधता शोधता,
मन पार भरकटले होते.

आठवणींच्या गावी,
मग त्यांचा ठाव लागला.
तेव्हा कुठे मग माझ्या,
जीवात जीव आला.

शब्द मज म्हणाले :
गवसण्यास आम्हाला,
ओलांडून वेस या नजरेची,
घे भेट त्या सोनेरी क्षितिजाची.

शब्दात मग शब्द गुंतले,
मनाच्या पानावर बोल नवे उमटले.
जाता जाता हृदयाच्या तराण्यावर,
हे गीत नवे उमलले.


Monday, July 11, 2011

पुन्हा 'single'

हल्ली जरा एकटंच,
राहवसं वाटतं.
तिच्या आठवणींसोबत जरा,
एकटंच बसावसं वाटतं.

आजही तीचा चेहरा,
सारखा मला आठवतो.
प्रत्येक आठवणीसोबत,
तीचा आवाज माझ्या कानात दाटतो.

पावसातही हल्ली मी,
एकटाच चालत असतो.
ती सोबत नसल्याचे पाहून,
पाऊस देखील नाहीसा होतो.

तिचे-माझे सारेच पावसाळे,
आता काळजात चिखल बनून अडकलेत.
तीची वाट पाहून तर आता,
डोळ्यातील अश्रु देखील सुकलेत.

प्रेमाचा experience,
एकदा मी घेतलाय.
आता पुन्हा प्रेमात पडायला,
माझं काही डोकं नाही फिरलय.

जवळचा मित्र आता त्याच्या,
girlfriend ला घेऊन फिरवतो.
आणि आम्ही आता पुन्हा,
'single' चे status मिरवतो.


Tuesday, July 5, 2011

प्रेमात पडल्यावर...

स्वप्नांच्या गावी जाणं,
आता रोजच होत असतं.
जागेपणी देखील आता,
स्वप्नांतच जगणं असतं.
बहुतेक प्रेमात पडल्यावर,
हे असंच होत असतं.

रात्र रात्र जागणं,
आता नेहमीचं झालेलं असतं.
तिच्याबद्दल चांदण्यांना सांगणं,
आता सवयीचं झालेलं असतं.
बहुतेक प्रेमात पडल्यावर,
हे असंच होत असतं.

मन माझं सारखं,
आता उधाणलेलं असतं.
वार्‍यावरती ते सारखं,
आता बेभान उडत असतं.
बहुतेक प्रेमात पडल्यावर,
हे असंच होत असतं.

कडाक्याची थंडी देखील,
आता गुलाबी वाटत असते.
शहारलेल्या जीवाला,
तिची उणीव भासत असते.
बहुतेक प्रेमात पडल्यावर,
हे असंच होत असते.

सकाळ, संध्याकाळ मन फक्त,
तिच्याच विचारात गुंतलेलं असतं.
आठवणींच्या कवडस्यात फक्त,
तिच्याच प्रेमाचं चांदणं असतं.
बहुतेक प्रेमात पडल्यावर,
हे असंच होत असतं,
हे असंच होत असतं...