Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Wednesday, April 27, 2011

जाता जाता...

वाटते जणू ही, 
कालचीच गोष्ट.
माझ्याशी बोलत असलेली ती,
दिसते मला स्पष्ट.

ओले होतात डोळे, 
चेहरा तिचा आठवताना.
काहीच कसं वाटलं नाही तिला, 
मला सोडून जाताना ?

बाहेर पडणार्‍या पावसाला बघताच,
तिचे-माझे सारेच पावसाळे डोळ्यासमोर उभे राहतात.
प्रत्येक थेंबाला ओंजळीत घेताना,
तिच्यासवे घालवलेले सर्वच क्षण चिंब भिजून जातात.

गर्दीतून चालत असतानाही,
एकटं असल्यासारखं वाटतं.
ती जवळ नसतानाही,
तिने हाक मारल्यासारखं वाटतं.

उगीच नजर ही माझी,
चोहीकडे फिरते.
तिला शोधण्याचा, 
निरर्थक प्रयत्नही करते.

तिने दाखवलेल्या स्वप्नांमध्ये,
आजही मी हरवतो.
ती सोबत नसल्याचे सत्य,
स्वतःला समजवण्यास धडपडतो.

तिच्यावर तर मी, 
रागावूही शकत नाही.
कारण जीवापाड प्रेम तिच्यावर,
कधी न केल्याचं मला आठवत नाही.

next valentine ला gift देण्यासाठी,
केली होती पैशांची साठवण.
पण.......पण, जाता जाता देऊन गेली ती,
फक्त.......'______' नावाची आठवण...


Sunday, April 24, 2011

मग का हा अबोला.....???

तुला काय जाण,
तीळ तीळ तुटतो हा जीव तुझ्यासाठी.
करतो मी जीवाचं रान,
तुझी नी माझी नजरा-नजर होण्यासाठी.

हृदयाच्या कप्प्यात तुला,
ठेवलं आहे जपून.
शंका असेल तुला,
तर दाखवतो काळीज कापून.

आता तर माझ्या,
स्वप्नात देखील तूच असतेस.
पाहावं मी जिकडे,
तिकडे देखील तूच दिसतेस.

एकदा-दोनदा बोललो तुझ्याशी,
पण ते फक्त तेवढ्यासाठी.
कधीतरी बोलशील तू पण माझ्याशी,
येतो कॉलेजला फक्त मी तेवढ्यासाठी.

वाट बघतोय मी चातकाप्रमाणे,
हाक मारतेस तू कधी मला नावाने.
प्रार्थना करतो देवाकडे,मी अगदी नेमाने,
जवळ येशील माझ्या तू कधीतरी प्रेमाने.

चोरून बघतेस मला,
तू डोळ्यांच्या कोनातून.
comments वर माझ्या,
छान हसतेस तू गालातून.

शेवटी न राहून मन माझं, 
विचारतं फक्त एकाच प्रश्न तुला,
सांग प्रिये सांग ,
मग का हा अबोला.....???


Saturday, April 23, 2011

माझी लव्ह स्टोरी...

पावसाळ्याचे दिवस ते,
होते सर्व चिंब चिंब.
उगवली होती हिरवळ सर्वत्र,
हवेत होता एक मंद मंद सुगंध.

होता तो कॉलेजचा दिवस पहिला,
नवलाईचे वारे वाहत होते सर्वत्र.
निघालो होतो बेभान होऊन,
तारुण्याच्या या मोहक वाटेवरून.

इतक्यात एक थंड झुळूक,
गेली माझ्या बाजूने.
वळून पाहतो तो काय,
होती ती एक सोज्वळ अप्सरा.

पहिले तिला मी डोळेभरून,
हरवले क्षणभर भान माझे.
वाटले जणू मला,
पहली नजर में पहला प्यार हो गया.

सुटलं कॉलेज तेव्हा,
मी होतो बाहेरच.
वाट तिची बघत,
मदतीला होताच पाऊस माझ्या.

आली ती कॉलेजच्या बाहेर,
नव्हती छत्री तिच्याकडे.
मी म्हटलं : मी सोडतो तुला घरी,
गालातच हसली ती छान.

छत्री होती माझी,
मात्र तिचा वापर,
फक्त आणि फक्त 'तिच्या'चसाठी.
मन तर माझं अगदी तरंगतच होतं.

चालताना होणारा तिच्या त्या,
ओलसर ओढणीचा टच......आई गं.....
मनात तर अगदी आनंद कल्लोळ.
गेटजवळ बिल्डींगच्या सोडलं तिला,
की पुढची सगळी रात्र तिच्याच आठवणींच्या कुशीत.

मग या मनमोहक प्रसंगाची,
होऊ लागली पुनरावृत्ती.
फरक फक्त एवढाच की,
तिच्यातलं आणि माझ्यातलं,
अंतर उरलं होतं फक्त छत्रीच्या दांड्याएवढं.

बाहेर पडणारा पाऊस...
त्यात एकच छत्री...
छत्रीच्या दंडूक्याला धरताना,
एकमेकांच्या हातावर हळुवार,
अकस्मात चढणारी बोटं...

मग.....मग काय,
चौपाटीवर  दोघंही,
त्याच छत्रीत शिरले,
की जग पेटवा तिकडे.....

तर अशी होती ही माझी लव्ह स्टोरी...






Friday, April 22, 2011

प्रेम करतो तुझ्यावर...

प्रेयसी (प्रियकरला) : का माझ्यावर एवढं प्रेम करतोस ?
प्रियकर                  : ???????
प्रेयसी (प्रियकरला) : सांग ना, का माझ्यासाठी एवढा झुरतोस ?
प्रियकर (प्रेयसीला) : प्रेम हे शब्दात व्यक्त करता येत नसतं, तरी तू एवढा हट्ट धरतेस तर ऐक......


प्रेम करतो तुझ्यावर,
आठवणींच्या पावसात चिंब भिजण्यासाठी,
बेधुंद मनासोबत उडण्यासाठी,
त्या गोड स्वप्नांमध्ये भरकटण्यासाठी,
बसल्या ठिकाणीच हरवण्यासाठी,
प्रेम करतो तुझ्यावर फक्त तुझ्यासोबत जगण्यासाठी.....

प्रेम करतो तुझ्यावर,
माझं एखादं गुपित तुला सांगण्यासाठी,
तुझे दुःख माझे करण्यासाठी,
तू बोलत असताना फक्त तुझ्याकडे बघण्यासाठी,
तुझ्या या बोलक्या डोळ्यांमध्ये खोलवर डुंबण्यासाठी,
प्रेम करतो तुझ्यावर फक्त तुझ्यासोबत जगण्यासाठी.....

प्रेम करतो तुझ्यावर,
तुझा हात हातात घेऊन समुद्रकिनार्‍यावर फिरण्यासाठी,
तुझं डोकं खांद्यावर घेऊन तुला धीर देण्यासाठी,
एकच चॉक्लेट दोघांनी अर्ध-अर्ध खाण्यासाठी,
तुझ्या कानात हळूच 'I love U' म्हणण्यासाठी,
प्रेम करतो तुझ्यावर फक्त तुझ्यासोबत जगण्यासाठी.....

प्रेम करतो तुझ्यावर,
भर पावसात तुझ्यासोबत चालण्यासाठी,
तुझ्या चेहर्‍यावरची बट मागे सारून तुला बघण्यासाठी,
तू समोर नसताना तुझ्याच विचारात तरंगण्यासाठी,
तुझी आठवण आल्यावर स्वतःशीच हसण्यासाठी,
प्रेम करतो तुझ्यावर फक्त तुझ्यासोबत जगण्यासाठी.....

प्रेम करतो तुझ्यावर,
तू सोबत असताना जगाला विसरण्यासाठी,
तू रुसलेली असताना तुला हसवण्यासाठी,
माझे सर्वस्व तुझे करण्यासाठी,
तुझ्यापुढे माझा जीव ओतण्यासाठी,
प्रेम करतो तुझ्यावर फक्त आणि फक्त 'तुझ्या'चसोबत जगण्यासाठी.....



आयुष्य खूप सुंदर आहे

झटकून टाक ही बंधने, घे श्वास नवा
झोकून दे स्वत:ला, घे आस्वाद नवा.
उडू दे मनाला या उनाड वार्‍यासंगे,
डुंबू दे मनाला, त्या आठवणींच्या डोहामध्ये.
आयुष्य खूप सुंदर आहे,
जग ते अगदी.....दिल से...

थांब थोडा वेळ, बघ तो इंद्रधनू
बघ कशी होतेय, ही सप्त रंगांची उधळण
थांब थोडा वेळ, बघ या समुद्राच्या लाटा,
ऐक त्यांचे ते हळुवार गाणे.
आयुष्य खूप सुंदर आहे,
जग ते अगदी.....दिल से...

बस या माळरानावर कधीतरी, नको विचारू का?
बघ त्या पक्षांकडे, वाटेल तुला क्षणभर
मीही उडावे असे स्वच्छंदी, असेच आनंदी.
दूरवर फेक तुझी नजर भिडू दे या गगनाला.
आयुष्य खूप सुंदर आहे,
जग ते अगदी.....दिल से...

होऊन जाऊ दे पुन्हा एकदा, शर्यत या वार्‍यासंगे
बघूया कोण जिंकते, हा सुसाट वारा की हे बेभान मन 
हळूच उघड ती आठवणींची कुपी,
दरवळू दे त्या आठवणी तुझ्याभोवती. 
आयुष्य खूप सुंदर आहे,
जग ते अगदी.....दिल से...

आयुष्य हे एकदाच मिळतं, म्हणून सांगतोय,
पसरूदे पंख मनाच्या या पाखराला. 
काढ डोळ्यांवरचा तो टेंशनचा चष्मा,
आणि बघ माझ्या नजरेतून, 
आयुष्य खूप सुंदर आहे,
जग ते अगदी.....दिल से...





जख्म दिया है तूने ऐसा

जख्म दिया है तूने ऐसा
जिसकी दवा सिर्फ तेरा प्यार है.

जरा देख नजर घुमा के,
हम भी है तेरे आसपास.
तरस रहे है कबसे ,
आने के लिए तेरे पास.
जख्म दिया है तूने ऐसा
जिसकी दवा सिर्फ तेरा प्यार है.

होटोंपे बस तेराही नाम है ,
दिल मे सिर्फ तेरीही तसवीर है.
हम तो बस इतनाही जानते है,
की तूही मेरी तकदीर है.
जख्म दिया है तूने ऐसा
जिसकी दवा सिर्फ तेरा प्यार है.

तेरी अदाओंने किया कैसा ये जादू,
पहलीही नजर मे कर दिया घायल.
तुझे पाने की चाहत मे ए सनम,
हो गये है हम पागल.
जख्म दिया है तूने ऐसा
जिसकी दवा सिर्फ तेरा प्यार है.

तेरे ही खयालोंमे अब हम,
रहते है खोए हरदम.
हमने तो इतनाही जाना है,
की तू ही है मेरी हमदम.
जख्म दिया है तूने ऐसा
जिसकी दवा सिर्फ तेरा प्यार है.

लगता है डर कभी कभी मुझे,
मर ना जाए कही तेरे बिना.
अब तो मुश्किल है जीना,
इस दुनिया मे तेरे बिना.
जख्म दिया है तूने ऐसा
जिसकी दवा सिर्फ तेरा प्यार है.


सांग माझी होशील का ?

कसं सांगू तुला ,
झालाय किती आतुर ,
तुझ्यासाठी हा जीव माझा
सुचत नाही दुसरं काही
तुझयाशिवाय मला,
म्हणूनच विचारतोय तुला,
सांग माझी होशील का ?

चोहीकडे तूच आहेस ,
होतो असा भास मला
प्रत्येक चेहर्‍यात दिसतो ,
फक्त आणि फक्त तुझाच चेहरा
म्हणूनच विचारतोय तुला ,
सांग माझी होशील का ?

शब्दच फुटत नाही तोंडातून ,
पाहतो जेव्हा तुला
धडधडायला लागतं काळीज माझं,
बघताच समोर तुला
म्हणूनच विचारतोय तुला ,
सांग माझी होशील का ?

केलस घायाळ तू ,
पहिल्याच नजरेत मला
वाटत होतं तेव्हा ,
तिथच करावं प्रपोज तुला
म्हणूनच विचारतोय तुला ,
सांग माझी होशील का ?

इवलसं काळीज हे ,
घाबरतं तुझ्या नकाराला
भावना माझ्या व्यक्त करण्यासाठी ,
लिहिल्या या चार ओळी तुला
आवडल्या तर........आवडल्या तर ,
सांग माझी होशील का ?