Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Tuesday, May 31, 2011

पहिली भेट

नाही-हो म्हणता म्हणता,
एकदाचा होकार तिने दिला होता.
आज-उद्या करता करता,
त्या पहिल्या भेटीचा मुहूर्त सापडला होता.

ठरल्या वेळेआधीच मी,
पोहचलो होतो तिथे.
सगळे मित्र फोन करून विचारात होते :
"काय राव आहात कुठे?"

एक-एक क्षण मला,
तासाप्रमाणे भासत होता.
तिची वाट बघताना,
माझा जीव कंठाशी आला होता.

इतक्यात...तिला पाहताच,
माझा जीव भांड्यात पडला.
मला झालेल्या आनंदाला,
पारावार न्हवता उरला.

मला पाहताच,
मस्त लाजली ती. 
ओठ दुमडून छान,
गालातच हसली ती.

अलगद पावले टाकत ती,
माझ्याजवळ येत होती.
दोघांमधले अंतर कापताना,
तिची गुलाबी ओढणी वार्‍यावर  उडत होती.

घरच्यांची नजर चुकवून,
ती भेटायला आली होती.
हे धाडस करताना ती,
थोडीशी घाबरली होती.

माझ्याशी बोलताना ती,
ओढणीशी चाळे करत होती.
बोलता-बोलता ती हळूच,
माझ्याकडे बघत होती. 

सूर्याने आकाशाची साथ सोडताच,
उशीर झालाय, हे दोघांनाही कळून चुकलं.
"निघायला हवं" म्हणताना,
तिला होणारं दुःख, मला कळून चुकलं.

जाताना ती अचानक थांबली,
मागे वळून परत जवळ आली.
पुन्हा भेटू म्हणता म्हणता,
ती गालावर एक 'kiss' देऊन गेली.

तिने दिलेली 'kiss',
मी आजही 'miss' करतो.
तुमची देखील पहिली भेट,
अशीच romantic होवो, 
हीच तुम्हाला 'wish' करतो.


Thursday, May 26, 2011

आठवण तुझी येता...

आठवण तुझी येता,
मी स्वतःलाच हरवून बसतो.
माहित नाही का,
पण मी स्वतःशीच हसू लागतो.
आठवण तुझी येता...

आठवण तुझी येता,
मन पळू लागते उधाण.
माहित नाही का,
पण होऊन जातो मी बेभान.
आठवण तुझी येता...

आठवण तुझी येता,
जग अगदी थांबल्यासारखे वाटते.
माहित नाही का,
पण हृदयाला ते अगदी रम्य वाटते.
आठवण तुझी येता...

आठवण तुझी येता,
पापण्या अलगद मिटून जातात माझ्या.
माहित नाही का,
पण तू दिसतेस या मिटलेल्या पापण्यांत माझ्या.
आठवण तुझी येता...

आठवण तुझी येता,
जीव अगदी कासावीस होतो.
माहित नाही का,
पण तो तीळ तीळ तुटतो.
आठवण तुझी येता...

आठवण तुझी येता,
सर्व अंतरे पुसून तुला भेटावसं वाटतं.
माहित नाही का,
पण तुझ्याशी दोन क्षण बोलावसं वाटतं.
आठवण तुझी येता...

आठवण तुझी येता,
मन अगदी बहरून येते.
माहित नाही का,
पण... कधी कधी वाटतं...
काय तुलाही असंच वाटतं...?
आठवण माझी येता...


Thursday, May 19, 2011

त्या रात्री...

विरहाच्या दुःखात,
ती पार बुडाली होती.
पाणावले होते,
तिचे टपोरे डोळे...कदाचित,
म्हणून त्या रात्री,
खूप पाऊस होता.

जड अंतःकरणाने,
मलाही वाटत होतं की,
माझ्या डोळ्यातले अश्रू,
तिला दिसू नयेत...कदाचित,
म्हणून त्या रात्री,
खूप पाऊस होता.

देवालाही वाटत होतं की,
येणार्‍या प्रत्येक सरीबरोबर,
दोघांच्याही कटू आठवणी, 
अलगद वाहून जाव्यात...कदाचित,
म्हणून त्या रात्री,
खूप पाऊस होता.

तिचं डोकं मी,
छातीशी घेतलं होतं.
माझ्या चिरलेल्या हृदयाचे बेसूर गाणे,
तिला ऐकू जाऊ नये...कदाचित,
म्हणून त्या रात्री,
खूप पाऊस होता.

दोघांनी एकमेकांचा,
शेवटचा निरोप घेतला.
झालेल्या उशीराचं कारण,
घरी दोघांनाही सांगता यावं...कदाचित...,
कदाचित म्हणून त्या रात्री,
खूप पाउस होता.



Tuesday, May 17, 2011

सारखं वाटतं...

सारखं वाटतं,
ती नेहमी सोबत असावी.
पण ती सोबत असताना,
तिच्याकडे फक्त पाहत बसावं.

सारखं वाटतं,
तिच्याशी खूप बोलावं.
पण ती बोलत असताना,
डोळे मिटून फक्त ऐकत बसावं.

सारखं वाटतं,
तिच्यासोबत खूप चालावं.
पण चालत असताना,
रिमझिम पाऊस असावा.

सारखं वाटतं,
चांदण्या रात्री तिला प्रपोज करावं.
पण प्रपोज करताना,
चंद्र साक्षीला असावा.

सारखं वाटतं,
फक्त तिच्यासाठी जगावं.
पण तिच्यासाठी जगताना,
कधीतरी तिने देखील,
माझ्यावर मरावं.



Saturday, May 14, 2011

आयुष्याच्या वाटेवर...

आयुष्याच्या वाटेवर,
दोन पावलं सोबत चालेल,
असं कुणीही दिसत नसतं.
थकलेलं शरीर जणू,
बस म्हणत असतं.
तरीही चालत राहतं,
हे मन माझं...

आयुष्याच्या वाटेवर,
दोन गोष्टी share करील,
असं कुणीही दिसत नसतं.
ज्याला आपलं म्हणावं,
असं कुणीच कसं दिसत नसतं?
तरीही चालत राहतं,
हे मन माझं...

आयुष्याच्या वाटेवर,
येता-जाता बरीच माणसे भेटतात.
जीवाला जीव लावणारी,
आठवणीत राहतात.
इतर काळासोबत विरून जातात.
तरीही चालत राहतं,
हे मन माझं...

आयुष्याच्या वाटेवर,
अचानक काही क्षण,
गोड घटनांची,
साक्ष देऊन जातात.
तर काही मनाला चटका लाऊन जातात. 
तरीही चालत राहतं,
हे मन माझं...

आयुष्याच्या वाटेवर,
एक ठराविक व्यक्ती भेटते,
जी नकळत हृदयात जाऊन बसते.
पण काळाच्या ओघात,
तीही निघून जाते.
पण तरीही....तरीही चालत राहतं,
हे मन माझं...



Tuesday, May 10, 2011

थोडंसं मनातलं...

लायब्ररीत बसली होती ती,
माझ्याकडे बघताच छान खुलली ती.
पण इतक्यात लायब्रेरीअन ओरडला सर्वाना :
''silence please".
म्हणून थोडंसं मनातलं माझ्या,
राहून गेलं सांगायचं तिला.

कॅन्टीनमध्ये बसली होती ती,
माझ्याकडे बघताच थोडीशी लाजली ती.
पण इतक्यात तिच्या मैत्रिणी आल्या,
अन तिला सोबत घेऊन गेल्या.
म्हणून थोडंसं मनातलं माझ्या,
राहून गेलं सांगायचं तिला.

बस स्टॉप वर भेटली ती,
माझ्याकडे बघताच गालातच हसली ती.
पण इतक्यात तिची बस आली,
अन ती गर्दीत नाहीशी झाली.
म्हणून थोडंसं मनातलं माझ्या,
राहून गेलं सांगायचं तिला.

बाजारात भाजी घेताना दिसली ती,
माझ्याकडे बघताच घाबरली ती.
कारण इतक्यात तिची आई समोर आली,
अन आईसोबत ती घरी निघून गेली.
म्हणून थोडंसं मनातलं माझ्या,
राहून गेलं सांगायचं तिला.

एकदा मीच गेलो तिच्या घरी,
मोठ्या हिमतीने दारावरची बेल वाजवली.
पण इतक्यात दरवाजा तिच्या बापाने उघडला,
मी लगेच तिथून काढता पाय घेतला.
म्हणून थोडंसं मनातलं माझ्या,
राहून गेलं सांगायचं तिला.

नंतर एकदा वाटेत भेटली ती,
माझ्याकडे बघताच थांबली ती.
मोठ्या धीराने मी 'i love you' म्हटलं तिला.
म्हणालो : एवढ्या दिवसापासून,
हेच थोडंसं मनातलं माझ्या,
राहून गेलं होतं सांगायचं तुला.



Friday, May 6, 2011

फक्त तुझ्या मिठीत घे...

भर दुपारी,
सूर्य 'मी' म्हणत असताना.
अन इतक्यात कुठूनतरी एक ढग,
सूर्यासमोर आला असताना.
झंकारलेल्या सर्वस्वाने,
फक्त तुझ्या मिठीत घे...

भर पावसात दोघं,
चिंब भिजलेले असताना.
अन ओल्या पायवाटेने दोघं,
घरी परतत असताना.
झंकारलेल्या सर्वस्वाने,
फक्त तुझ्या मिठीत घे...

गुलाबी थंडीत दोघं,
गारठलो असताना.
अन हा गार गार वारा,
अंगाला झोंबत असताना.
झंकारलेल्या सर्वस्वाने,
फक्त तुझ्या मिठीत घे...

अमावास्येच्या रात्री,
चांदण्या सोबतीला असताना.
अन पौर्णिमेच्या रात्री,
चंद्र साक्षीला असताना.
झंकारलेल्या सर्वस्वाने,
फक्त तुझ्या मिठीत घे...

मनावर माझ्या,
तुझीच धुंदी असताना.
अन डोळ्यांत माझ्या,
तुझीच नशा असताना.
झंकारलेल्या सर्वस्वाने,
फक्त तुझ्या मिठीत घे...



Tuesday, May 3, 2011

प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे,
कॉलेजची खरी मजा असते,
तारुण्याची पक्की पावती असते.
नात्यांची रेशम गाठ असते,
जन्मो-जन्मीची साथ असते.

प्रेम म्हणजे,
कधी स्वप्नांमधे हरवणं असतं,
कधी स्वतःशीच हसणं असतं.
लाडाने तिच्या कुशीत शिरणं असतं,
तिच्यासोबत जगणंच सर्वस्व असतं.

प्रेम म्हणजे,
एकमेकांच्या धुंदीत जगणं असतं,
गुलाबी थंडीत तिला मिठीत घेणं असतं.
भर पावसात तिच्यासोबत भिजणं असतं,
भर उन्हात तिच्यासोबत फिरणं असतं.

प्रेम म्हणजे,
नव्या दुनियेत पहिलं पाउल असतं,
शब्दांशिवाय डोळ्यांनीच बोलणं असतं.
तिने उगीच रुसणं असतं,
मग त्याने तिला समजावणं असतं.

प्रेम म्हणजे,
बेभान मनाचा 'स्टॉप' असतं,
कवी मनाची प्रेरणा असतं.
पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे,
प्रेम म्हणजे.....प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं!